कांदिवलीतील कल्पना चावला चौकाची दुरवस्‍था

कांदिवलीतील कल्पना चावला चौकाची दुरवस्‍था

कांदिवलीतील कल्पना चावला चौकाची दुरवस्‍था
कचरा वेचकांचा बनला अड्डा; पालिकेचे दुर्लक्ष
कांदिवली, ता. ३१ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील महावीरनगर सिग्‍नलजवळील अंतराळ वीरांगना कल्पना चावला चौकाची दुरवस्‍था झाली आहे. सध्या हा चौक भिकारी, कचरा वेचकांचा अड्डा बनला आहे. त्‍यामुळे पालिकेने या चौकाच्या देखभालीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कांदिवलीकरांनी केली आहे.
कल्पना चौकाभोवती प्लास्‍टिकचे पुठ्ठे, पिशव्या पडलेल्‍या दिसत आहेत. नेहमीच इथे महिला, लहान मुलांचा गोंधळ सुरू असतो. त्‍यामुळे या चौकाचे विद्रुपीकरण होत आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासन, महानगरपालिका आणि राजकीय पक्ष्यांचे दुर्लक्ष झाल्‍याने संताप व्यक्त होत आहे. पालिकेने तातडीने बस्तान मांडलेल्या लोकांना हाकलवून परिसर स्वच्छ आणि सुरक्षित करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महावीरनगर हा उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या इमारतींचा विभाग आहे. येथील सिग्नल चौकात खाऊ गल्ली आणि समोरच डी मार्ट आहे. बाजूला कमला विहार स्पोर्ट्स क्लब आहे. दिवंगत नगरसेविका शैलजा गिरकर यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून या गजबजलेल्या चौकाचे ‘अंतराळ वीरांगना कल्पना चावला चौक’ असे नामकरण केले. एक अंतराळ आणि कल्पना चावला यांचे शिल्प असलेला प्रशस्त चौक साकारण्यात आला. याबाबत कांदिवलीकरांनी गिरकर यांचे कौतुक करून आभार मानले होते. या चौकामुळे कांदिवलीच्या सौंदर्यात भर पडली होती. मात्र, गेले दोन महिने हा चौक भिकारी, कचरावेचकांचा अड्डा बनला आहे.
पिशव्यांचे ढिगारे लावणे, दिवसभर बस्तान मांडून भांडण करणे, शिवीगाळ, मारामारी सुरूच असते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. सदर सुशोभीकरण केलेल्या कल्पना चावला चौकाची दयनीय अवस्था पाहून प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेने कल्पना चावला चौकाची दखल घेत, बस्तान मांडलेल्या नागरिकांना हाकलावून स्वच्छ करावा, अशी मागणी केली आहे. चौकाची तातडीने पाहाणी करून योग्य कार्यवाही केली जाईल, अशी प्रतिक्रिया पालिकेचे अभियंता जैस्वाल यांनी दिली.

मुख्य चौकात अंतराळ वीरांगना चौकाची पालिकेने गांभीर्याने दखल घ्यावी. अशा चौकाची ही अवस्था पाहवत नाही.
- प्रमोद घाग, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com