स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

कांदिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात
कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील शाखा क्र.२० च्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती सोहळा दिमाखात पार पडला. शाखाप्रमुख विजय मालुसरे, महिला शाखा संघटक प्रियांका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. विभागप्रमुख अजितदादा भंडारी यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच सावरकर यांचा जीवनपट करणाऱ्या पुस्तकांचे प्रदर्शनदेखील भरवण्यात आले होते. या सोहळ्यास विभानसभा प्रमुख संतोष राणे, राजन निकम, राजू खान, मनोज मोहिते यांच्यासह सावरकर, इतिहासप्रेमी सहभागी झाले होते. सायंकाळी सावरकर गीतांच्या कार्यक्रमाने श्रोत्‍यांच्या अंगावर शहारे उभे केले. पाहुण्यांना सावरकरांच्या जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आली. सावरकरांच्या संघर्षावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन व पुस्तके भेट देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com