डहाणूत पुस्तक दान अभियान

डहाणूत पुस्तक दान अभियान

वाणगाव, ता. १ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील बहुतांशी कुटुंबे ही शेतकरी वर्गातील आहेत, तरीही आपल्या पाल्याने पदवी शिक्षण पूर्ण करावे व स्पर्धा परीक्षांना सामोरे जाऊन सरकारी अधिकारी बनावेत, अशी मोठी स्वप्ने असतात. आर्थिक बाबींचा ताळमेळ बसत नसल्याने आणि परिस्थितीअभावी अनेक मुलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न अधुरे राहते. या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पुस्तक रूपाने का होईना, हातभार लागावा हा प्रयत्न आहे. या उद्देशाने पालघर जिल्ह्यामध्ये सिन्नरमधील उडान फाऊंडेशनतर्फे पुस्तकदान अभियान ही मोहीम राबविण्यात येणार आहे, असे प्रा. परशुराम भोईर यांनी सांगितले.

या उपक्रमात जुनी/ नवी सुस्थितीतील मराठी व इंग्रजी माध्यमांची पुस्तके दान करू शकता. पुस्तकरूपी दान अनाथ, गरीब, गरजू मुलांपर्यंत पोहोचण्यात येणार आहे; तरी नववी ते पदवी, एमपीएससी, यूपीएससी, जेईई, नीट, सेट आदी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी या मोहिमेत योगदान द्यावे. पुस्तके दान करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी, पालकांनी ३०१, आदित्य अपार्टमेंट, मसोली, ता. डहाणू, पिन कोड ४०१६०२ अथवा कासा, डोंगरीपाडा येथे ९४२३३६६५३३, ९२७३१७६६४६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून १० जूनपर्यंत पत्त्यावर जमा करण्यात यावीत, असे भोईर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com