अग्निशमन दलाकडून मुलाची सुटका

अग्निशमन दलाकडून मुलाची सुटका

अग्निशमन दलाकडून मुलाची सुटका
कळवा, ता. १ (बातमीदार)ः घरातील बेडरूमच्या दरवाजाच्या लॉकमध्ये बिघाड झाल्याने दरवाजा लॉक होऊन अडकलेल्या लहान मुलाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना शुक्रवारी (ता ३१) रात्री साडेबाराच्या सुमारास शीळफाटा परिसरातील खर्डी गावात घडली. मयंक नीलेश बेटकर (वय ८) असे त्या मुलाचे नाव आहे.
मयंक हा आपल्या बेडरूममध्ये मोबाईलवर खेळत होता. दरवाजा जोरात ढकलल्याने लॉकमध्ये बिघाड झाल्याने तो बेडरूममध्येच अडकला होता. रात्री साडेबाराच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत लॉक तोडून मुलाची सुखरूप सुटका केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com