शास्त्रीय संगीत, लोकनृत्याचा अविष्कार

शास्त्रीय संगीत, लोकनृत्याचा अविष्कार

वाशी, ता. २ (वार्ताहर) : इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इन्फोसिस फाऊंडेशन-भारतीय विद्या भवन कल्चरल आउटरीच प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते १३ जून या कालावधीत होणाऱ्या या कार्यक्रमात नवी मुंबईकरांना भारतीय संस्कृतीचा आणि लोकनृत्यांचा अनुभव घेता येणार आहे. वाशी, सेक्टर ३० येथील भारतीय विद्याभवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६:३० ते ८:३० यादरम्यान आठवडाभर चालणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असणार आहे.
भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ‘कल्चरल आउटरीच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशांनी या कार्यक्रमाची सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) प्रसिद्ध हिंदुस्थानी गायक आणि सी. आर. व्यास यांचे शिष्य पंडित संजीव चिम्मलगी यांच्या पारंपरिक महाराष्ट्रीय भक्तिगीतांचे सादरीकरण होणार आहे. तसेच जीव्हीआरएनके फाऊंडेशनचे विद्यार्थी पारंपरिक भरतनाट्यम नृत्य सादर करणार आहेत.

-------
चक्रीभजन, सुफी संगीत
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे गुरू बाबाजी औसेकर महाराज यांच्या चक्री भजनाचे आयोजन शनिवारी (ता. ८) करण्यात आले आहे. रविवारी (ता. ९) भूषण कोरगावकर यांच्या लावणी नृत्याचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. सोमवारी (ता. १०) महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि इतर राज्यातील पारंपरिक लोकनृत्यांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. मंगळवारी (ता. ११) प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १२) प्रसिद्ध लोकगायक मुख्तियार अली यांच्या सुफी संगीताच्या पर्वणीचा अनुभव रसिकांना घेता येईल. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. १३) गुजरातमधील पारंपरिक काठीयावाडी नृत्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com