सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांसाठी खांदेपालट

सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांसाठी खांदेपालट

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या वरिष्ठ पदांच्या कार्यभारामध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी खांदेपालट केला आहे. शहर अभियंता संजय देसाई हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार सोपावण्यात आला आहे. यामध्ये त्यांच्याकडे स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी, पर्यावरण आणि संगणक हे विभाग असणार आहेत. तसेच यापूर्वी त्यांच्याकडे असलेला मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त या पदांचाही कार्यभार कायम असणार आहे.
कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांच्याकडे अतिरिक्त शहर अभियंता म्हणून कार्यभार असणार आहे. त्यांच्याकडे मलनिस्सारण, पाणीपुरवठा आणि स्थापत्य या विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. घनकचरा विभागाच्या उपायुक्तपदी आरोग्य विभागाचे डॉ. अजय गडदे यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. डॉ. गडदे यांच्याकडे आरोग्य विभागातील मूळ कामकाजासह हे अतिरिक्त काम सोपवण्यात आले असून त्यांच्याकडील सहायक आयुक्त अतिक्रमण या पदाचा कार्यभार कमी करण्यात आला आहे. उपायुक्त शरद पवार यांच्याकडे प्रशासन, मालमत्ता कर व इतर विभाग, वाहन व यांत्रिकी, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन आदींचा कार्यभार देण्यात आला आहे. उपायुक्त किसनराव पालांडे यांच्याकडे समाजविकास विभाग, परवाना, ग्रंथालय, अभिलेख कक्ष सोपवण्यात आला आहे.

-------------
उपायुक्त परिमंडळ २चा कार्यभार गायकवाड यांच्याकडे
उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्याकडे दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र (ईटीसी वाशी), विधी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक संचालकपद देण्यात आले आहे. सहायक आयुक्त सागर मोरे यांच्याकडे ‘सी’ विभाग कार्यालय आणि विष्णुदास भावे नाट्यगृह व्यवस्थापक म्हणून; तर सहायक आयुक्त राजेंद्र चौगुले यांच्याकडे उपायुक्त भांडार विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. उपायुक्त परिमंडळ २ पदाचा कार्यभार दिघा विभागाचे सहायक आयुक्त डॉ. कैलास गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. शाखा अभियंता सुधाकर मोरे सेवानिवृत्त झाल्याने यांच्याकडे असलेला मलनिस्सारण विभागाचा कार्यभार उपअभियंता दीपक सूर्यराव यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com