अध्यादेश रद्द करण्याची मागणी

अध्यादेश रद्द करण्याची मागणी

अध्यादेश रद्द करण्याची मागणी
मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः वसाहत अधिकारी विभागातील दैनंदिन व संपूर्ण कामकाजाच्या सुसूत्रीकरणासंदर्भात परस्पर नव्याने निर्गमित केलेले आदेश विनाविलंब रद्द करण्याची मागणी म्युनिसिपल कामगार आणि कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. नियमबाह्य, बेकायदा हा अध्यादेश निर्गमित केल्‍याचे कदम यांनी सांगितले. बाबा कदम म्हणाले की, सहायक आयुक्त (अ. नि.) शहर हे परस्पर वसाहत अधिकारी खाते अथवा कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) यांच्या कर्तव्यसूचित बदल करू शकत नाहीत. सदर बाब त्यांच्या अधिपत्याखालील कामकाजाचा भाग नाही. तसेच पालिकेच्या कोणत्याही धोरणात्मक सेवाशर्तीत बदल करायचे असल्यास मान्यताप्राप्त युनियन यांना औद्योगिक कलह कायद्यातील तरतुदींनुसार चर्चा करून सर्व युनियनने संमती दिल्यानंतर बदल करणे आवश्यक आहे. वसाहत अधिकारी खाते व कार्यकारी अभियंता (इमारत व कारखाने) यांची दैनंदिन कामकाजाची कर्तव्यसूची ही पूर्णपणे वेगवेगळी आहे. या दोन्ही खात्याचा परस्परांशी दुरान्वये संबंध नाही, असे त्‍यांनी सांगितले. यासंदर्भात आपल्या दालनामध्ये बैठकीचे आयोजन करावे, अशी विनंती युनियनचे अध्यक्ष बाबा कदम यांनी पत्राद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com