जमा केलेल्या बिया सीड बॉल मध्ये रुपांतरीत

जमा केलेल्या बिया सीड बॉल मध्ये रुपांतरीत

‘सीड बॉल’च्या माध्यमातून चिमुकल्‍यांचे वृक्षारोपण
निसर्ग वैभव फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम; टेकड्यांवर फेकून झाडे रुजवणार
घाटकोपर, ता. २ (बातमीदार) ः निसर्ग वैभव फाऊंडेशन या संस्थेने यंदा विविध प्रजातींच्या झाडांच्या बिया संकलित करून त्‍याचे ‘सीड बॉल’ बनवले आहे. तयार केलेले गोळे पावसाळ्यामध्ये मोकळ्या परिसरात, टेकडीवर फेकून झाडे रुजवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सुट्टीचा दिवस असल्याने रविवारी (ता. २) घाटकोपर पश्चिमेतील गणेश मैदान पारशीवाडी येथे चिमुकल्या मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
फाऊंडेशनच्या सदस्यांनी विविध प्रजातीच्या बिया संकलित करून पारशीवाडी येथे ‘बीजगोळे’ अर्थात ‘सीड बॉल’ तयार करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. माती, कंपोस्ट खत आणि शेणाच्या मिश्रणात या बिया घालून ‘सीड बॉल’ तयार करण्यात आले. जांभूळ, बहावा, कहांडोळ, आपटा, सफेद कुडा, पळस, काटेसावर, बारतोंडी अशा वेगवेगळ्या दहापेक्षा जास्त प्रकारच्या संकलन केलेल्या बिया गोळा करण्यात आल्‍या. ६०० ते ७०० ‘सीड बॉल’ तयार केल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक वैभव ठाकरे यांनी सांगितले.

खंडोबा टेकडीवर बहरणार वृक्षवल्ली
घाटकोपरचा खंडोबा डोंगर सध्या अनेक झोपड्यांनी वेढला गेला आहे; तर डोंगराचा काही भाग ओसाड अवस्थेत दिसून येतो. या डोंगरावरच खंडोबा देवाचे खूप जुने मंदिर आहे. खंडोबाच्या दर्शनासाठी दर रविवारी दूरवरून लोक दर्शनासाठी येत असल्याने या परिसराला पर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधीकडून प्रयत्न सुरू आहे. अशातच या डोंगरावर झाडे बहरावी आणि वनसंपदा टिकावी, यासाठी निसर्ग वैभव फाऊंडेशनचे सदस्य दर रविवारी वृक्षारोपण करतात.


फोटो ओळ
घाटकोपर ः माती, शेण आणि कंपोस्ट खतात बिया टाकून त्याचे ‘सीड बॉल’ तयार करताना निसर्ग वैभव फाऊंडेशनचे सदस्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com