मुंबईत तिसऱ्या दिवशीही वाहतूक संथगतीने

मुंबईत तिसऱ्या दिवशीही वाहतूक संथगतीने

मुंबईत तिसऱ्या दिवशीही वाहतूक संथगतीने

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मध्य रेल्वेवर ठाणे आणि सीएसटी स्थानकावर प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. आज दुपारी एक वाजता रेल्वे वाहतूक सुरू झाली असली, तरी ब्लॉकमुळे अनेक जणांनी रेल्वे प्रवास टाळला. त्यामुळे रविवारी खरेदीसाठी निघालेल्या मुंबईकरांनी खासगी गाडी किंवा बसने प्रवास करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे सायंकाळी मुंबईत सलग तिसऱ्या दिवशीही वाहतूक संथगतीने सुरू होती.
एकीकडे रेल्वे ब्लॉक आणि दुसरीकडे रस्तेमार्गावरही हाल, अशी मुंबईकरांची शुक्रवार व शनिवारी दुहेरी कोंडी झाली. रविवारी सुट्टी असल्याने  काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  मेगाब्लॉकमुळे प्रवाशांनी रिक्षा किंवा टॅक्सीने जाणे पसंत केले; मात्र त्याचा गैरफायदा रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी घेतला. रिक्षाचालक अनेकदा प्रवाशांशी मुजोरीने वागले, अरेरावी केली. रेल्वे ब्लॉकमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. त्यातच बस आणि रेल्वेपेक्षा काही जणांनी ॲप आधारित गाड्यांनी घरी जाणे पसंत केले; परंतु नेहमीच्या तुलनेत अधिक भाडे आकारले गेल्याने त्याविरोधात प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. कुर्ला, चेंबूर या स्थानकांबाहेर रिक्षाचालक; तर सीएसएमटी, दादर, वडाळा स्थानक परिसरात टॅक्सी चालक जवळचे भाडे नाकारत होते; तसेच जादा भाडे घेण्यात येत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com