ग्रामीण परिसरात बहुरुपी कलावंतांची भटकंती

ग्रामीण परिसरात बहुरुपी कलावंतांची भटकंती

कासा, ता. ५ (बातमीदार) : अनेक बहुरूपी कलावंत पोटापाण्यासाठी राज्याच्या अनेक गाव-खेड्यात येऊन आपली कला सादर करून रोजगार मिळवतात. सध्या डहाणू तालुक्यात अनेक बहुरंगी कलावंतांची संख्या वाढली असून अमरावती जिल्ह्यातील चंदरखेडा येथील पाच ते सहा कलावंत विविध प्रकारच्या बहुरूपी कला सादर करून आपला उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.

डहाणू, पालघर तालुक्यातील अनेक गाव-खेड्यामध्ये हे कलावंत आले आहेत. कोणी विदूषक, यम, राक्षस, पोलिस, जादूगार, पक्षी यांची रूपे घेत अजूनही गाव-खेड्यात पारंपरिक प्रथा जपणारे नागरिक आहेत. घरासमोर आलेल्यांना दान दिले जाते. यात अनेक महिला शिधा, काही पैसे, कधी साडीचोळीसुद्धा दान करतात. बहुरूपी कलावंतांची कला सध्या फार कमीजण जोपासत असून ती लुप्त होण्याच्या मार्गावर असल्याचे रवींद्र खेडकर या कलाकाराने सांगितले. या बदलत्या काळात अजूनही विविध कलावंत या कला जपून आहेत. पूर्वीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या कलेला राजाश्रय दिला होता. विविध गुप्त बातम्या महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाई.

सध्या इंटरनेट, मोबाईलच्या या युगात बहुरूपी कलेकडे नागरिक दुर्लक्ष करत आहेत, पण पारंपरिक कला आम्ही जपण्याचा प्रयत्न करत आहोत, असे हे कलाकार सांगत आहेत. आम्ही असे प्रयत्न कला दाखवण्यासाठी करत आहोत, पण आमची पुढची पिढी या क्षेत्रात उतरण्यास तयार नाही. सध्या दररोज गाव-खेड्यात भटकंती करत पाचशे रुपये मिळतात, पण या महागाईच्या ते पुरेसे नाहीत. सरकारने देखील आमच्यासाठी काहीतरी मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी सांगितले.

आम्ही पाच ते सहा कुटुंबे अमरावती जिल्ह्यातून आलो आहोत. या ठिकाणी आजूबाजूच्या गाव-खेड्यात काही महिने बहुरूपी कला दाखवत मिळेल ते दान घेऊन पुढच्या प्रवासाला निघतो.
- रवींद्र खेडकर, बहुरूपी कलाकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com