मंगेश पाटील यांचे निधन

मंगेश पाटील यांचे निधन

पालघर (बातमीदार) : पालघर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते मंगेश भालचंद्र पाटील (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. १) मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. २) पालघर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मीनल, मुलगा केवल आणि विवाहित मुलगी स्मिता असा परिवार आहे. मुंबई येथील नोकरी करताना १९९० दशकात मंगेश पाटील आणि त्यांचे कुटुंबीय पालघर येथे स्थायिक झाले. १९९९ मध्ये पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. त्या वेळी त्यांनी कारभारात नियमितता आणून निविदा व ठेक्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारावर आक्षेप घेतला होता. पालघर जिल्ह्यासह कोकण विभागातील अनेक कार्यालयांत लेखापरीक्षण विभागात पाटील यांची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पालघरमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com