क्रिकेट खेळताना हदयविकाराने मृत्यू

क्रिकेट खेळताना हदयविकाराने मृत्यू

क्रिकेट खेळताना हदयविकाराने मृत्यू

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना एका ४२ वर्षीय इसमाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना मिरा रोड येथे घडली आहे. रामगणेश तेवर असे या व्यक्तीचे नाव आहे.
रामगणेश तेवर हे विकसकाच्या कार्यालयात काम करत होते. विकसकाने आपल्या कर्मचऱ्‍यांसाठी रविवारी (ता. २०) मिरा रोड येथील काशीगाव परिसरात टर्फ क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. या स्पर्धेत खेळत असताना रामगणेश यांनी एक जोरदार फटका मारला व लगेचच ते खाली कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. रामगणेश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com