बेस्ट उपक्रमाची अधोगती

बेस्ट उपक्रमाची अधोगती

बेस्ट उपक्रमाची अधोगती
चार वर्षांत ७३ बस मार्ग बंद : केवळ नवे ३० नवीन बस मार्ग प्रवासी सेवेत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला सध्या कार्यरत असलेले बस मार्ग सुरू ठेवण्यात दमछाक झाली आहे. मागील चार वर्षांत तब्बल ७३ बस मार्ग बंद झाल्याने बेस्टची अधोगती झाल्याचे दिसून येत आहे; मात्र ३० नवीन बस मार्ग सुरू केल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सुरक्षित व आरामदायी प्रवास म्हणून प्रवासी आजही बेस्ट बसला पसंती देतात; मात्र गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाची कोंडी वाढली आहे. दहा वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात पाच हजार आणि ५५ लाख प्रवासी प्रवास करत होते; मात्र हाच आकडा घसरला असून सद्यःस्थितीत तीन हजार बस असून २८ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा, यासाठी भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक वातानुकूलित बस दाखल करण्यात येत आहेत. २०२६ पर्यंत सात हजार बसचा ताफा होईल, असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात येतो. यात दोनशे डबलडेकर बसचा समावेश आहे; मात्र आतापर्यंत फक्त ५० डबलडेकर बस दाखल झाल्या असून ७०० बसचा पुरवठा करणाऱ्या काॅसिस कंपनीने नकार दिला आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून बसची संख्या तीन हजारांवर अडकली आहे. त्यात बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या १,०९५ बसची वयोमर्यादा संपुष्टात येत आहे. त्या पुढील काही वर्षांत त्या भंगारात काढण्यात येणार आहे. त्यामुळे बसअभावी प्रवाशांची परवड होत असून हळुवार बस मार्ग बंद करण्याची वेळ बेस्ट उपक्रमावर ओढावली आहे.

कोरोनापासून बंद असलेले मार्ग
१ मर्यादित, सी ११, १६ मर्या., २० मर्या., ३० मर्या., ४१, ए ४१, ४३, सी ४४, ४८, ६१, ६८, ७४, ७६, ८१ मर्या., ९३ मर्या., ९९, ए १०१, ए १०७, ए १०९, ए ११४, १३०, १३३, १५६, १५७, १६१, १६६, ए १७०, १७३, १८२, २१३, २१६, २२९, २५८, २६०, २८४, ए २९५, ३०६ मर्या., ३०९ मर्या. ३२९, ३५३, ३५८, ए ३६६, ३८४, ३८८ मर्या., ४०८, ४२९, ४४८ मर्या., ४४९ मर्या., ४५८ मर्या., ४८७ मर्या., ४९१ मर्या., ५०६ मर्या., ६३०, ६३१, ६३२, ६४०, ६७७ , ६७८, ७१२ मर्या., ७२० मर्या.

अंधेरी गोखले पुलामुळे बंद असलेले मार्ग - २९० मर्यादित, ३२४, ३२८, ३३६

सायन पुलावर प्रवेशबंदी
मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेला ११० वर्षे जुना सायन स्थानकातील ब्रिटीशकालीन रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमास १५ ते २० मार्ग बंद करावे लागतील, असे सांगण्यात आले.


बेस्ट उपक्रमातील बस ताफा
स्वमालकीच्या - १,०९५
भाडेतत्त्वावरील - २,००५
--------
एकूण - ३,१००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com