माथेरान घाटात दुचाकीचा अपघात

माथेरान घाटात दुचाकीचा अपघात

माथेरान घाटमार्गावरील अपघातात पती-पत्‍नी जखमी

नेरळ, ता. ३ (बातमीदार)ः माथेरानला आलेल्या पर्यटकांच्या दुचाकीचा घाटमार्गात अपघात झाला. अपघातात एक वर्षांची चिमुकली थोडक्यात बचावली असून पति-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान स्थानिकांनी जखमींना भिवपुरी येथील रुग्‍णालयात दाखल केले होते. त्‍यानंतर पुढील उपचारासाठी बदलापूरला हलवण्यात आले.
रविवारी (ता.२) माथेरान घाटमार्गावर वाहनांची सकाळपासूनच गर्दी होती. काही काळ वाहतूक कोंडीमुळे दस्तुरी नाका येथे लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. बदलापूर येथून मुबतसीर दानिश बुबेरे, पत्नी नमरा आणि एक वर्षाच्या मुलीसह माथेरानला दुचाकीवरून आले होते. परतीच्या प्रवासात घाटातील जुमापट्टी येथील अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्‍याने ती संरक्षण भिंतीला धडकली. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. यात बुबेरे पती-पत्‍नी गंभीर जखमी झाले तर चिमुकली थोडक्‍यात बचावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com