कशेडी घाटात उभारले हाईट गेट

कशेडी घाटात उभारले हाईट गेट

कशेडी घाटात उभारले हाईट गेट
अवजड वाहतुकीला बंदी; जुन्या मार्गावरून वर्दळीस परवानगी

पोलादपूर, ता. ४ (बातमीदार) ः कशेडी बोगद्यातून अवजड वाहने आणि एसटी बसला बंदी करण्यात आली आहे. त्‍यामुळे मुंबईहून तळ कोकणात जाणाऱ्या एसटी आणि अवजड वाहने पूर्वीप्रमाणे कशेडी बंगलामार्गे जाणार आहे. कशेडी बंगला, कशेडी गाव, पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील ग्रामस्थांसह कशेडी, मानेधार, दत्तवाडी, पार्टेवाडीसह परिसरातील अनेक गाव वाडीवस्तीतील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अवजड वाहतुकीसह एसटीला कशेडी बोगदामार्गे बंदी करण्यात आल्याची माहिती कशेडी पोलिसांकडून देण्यात आली आहे. फक्त चार चाकी लहान वाहने, दुचाकींची वाहने बोगद्यातून सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडत होता. अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन दिवसांपूर्वी हाईट गेट उभारले आहे. त्‍यामुळे अखेर या वाहतुकीला ब्रेक लागला आहे.
बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरिता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची वर्दळ सुरू होती. यामुळे अन्य वाहनचालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती. यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी हाईट गेट उभारण्यात आले होते. मात्र हे हाईट गेट अवजड वाहनचालकांनी अवघ्या दोन दिवसांत उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुन्हा मजबूत हाईट गेट उभारले आहे.
तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेलनजीक व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे मजबूत हाईट गेट उभारण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही बाजूला अवजड बॅरिगेट्‌सही लावले आहेत. यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com