भिवंडीत मतमोजणी केंद्राबाहेरच दुर्गंधी

भिवंडीत मतमोजणी केंद्राबाहेरच दुर्गंधी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : भिवंडी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (ता. ४) पार पडली. या वेळी उमेदवारांसह कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता जिल्हा निवडणूक विभागाकडून घेण्यात आली होती. दुसरीकडे मात्र मतमोजणी केंद्राबाहेर उभारण्यात आलेल्या फिरत्या शौचालयांपैकी काही भरून वाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती.
लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया सवाद येथील केयूडी बिझनेस कम्पा‍ऊंड येथे पार पडली. या वेळी मतमोजणी केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची आणि उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींच्या सोईसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून केंद्राबाहेर सहा ते सात फिरते शौचालय उभारण्यात आले होते. मात्र, या शौचलयांपैकी काही शौचालय भरल्यामुळे त्यातील मैला आणि पाणी बाहेर आले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. या ठिकाणी ये-जा करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com