ठाण्यात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी!

ठाण्यात गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी!

ठाणे, ता. ४ (वार्ताहर) : लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मंगळवारी (ता. ४) सकाळपासूनच कासारवडवली येथील मतमोजणी केंद्रावर कायकर्ते, नेते आणि प्रसारमाध्यमांची गर्दी होती. दुपारनंतर मोठ्या प्रमाणात ठाणे लोकसभा मतदारसंघात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत गेली. शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांना आघाडी मिळताच ठाण्याच्या वागळेमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पेढेवाटप करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नरेश म्हस्के यांनी ७५ हजार मतांची आघाडी घेतली. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनीही लाखोंची आघाडी मिळवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रभाकर शिंदे यांनी कार्यकर्त्यांसमवेत जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली; तर नरेश म्हस्के यांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरी आनंदनगर परिसरातील शाखेजवळ कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला; तर दुसरीकडे पिछाडीवर असलेल्या ठाकरे गटाच्या खासदार राजन विचारे यांच्या कंपूत नाराजीचे सूर उमटत होते. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानात जवळपास चार हजार ५६८ मते नोटाला होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com