खासदार श्रीकांत शिंदे यांची  हॅट्रीक

खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅट्रीक

खासदार श्रीकांत शिंदे यांची हॅटट्रिक


सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : महाराष्ट्रचे लक्ष लागून राहिलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विजयी हॅटट्रिक केली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत खासदार शिंदे यांनी आपली आघाडी कायम ठेवत विजय संपादन केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांचा पराभव केला.

राज्यातील प्रतिष्ठेच्या लढतींपैकी एक असलेल्या या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक जिंकण्यासाठी डॉ. शिंदे प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढत मतदारांचा कल जाणून घेत, त्यांना आपलेसे करण्यासाठी मागील चार महिन्यांपासून त्यांची संपूर्ण टीम काम करत होती. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच शिंदे हेच उमेदवार, अशी स्वयंघोषणा करीत महायुतीने या मतदारसंघात कामास सुरुवात केली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात शिवसेनेचा गड राखणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यातच त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघात होत असलेला भाजपचा परखड विरोध मोडून त्यांना उमेदवारी मिळवून देणे, यानंतर येथील विरोधकांचे मनसुबे ओळखून विरोधकांचा विरोध मोडून काढत मुलाचा मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावली. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या वैशाली दरेकर यांच्याकडे मनसेकडून लोकसभा निवडणूक लढल्याचा अनुभव असला तरी शिवसेनेचा मोठा गट शिंदेंसोबत गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांवर त्यांची भिस्त होती. जुन्या-जाणत्या शिवसैनिकांकडून कसा पाठिंबा मिळतो, यावर त्यांच्या मताचे गणित अवलंबून होते. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज होते. प्रचारात त्यांच्यासोबत फारसे पदाधिकारी, कार्यकर्ते फिरताना दिसत नव्हते. मोजक्या शिलेदारांच्या साथीने दरेकर या आपला प्रचार करत होत्या. मोजक्या मतदारसंघावर दरेकर यांनी आपले लक्ष केंद्रीत करत तेथेच प्रचारावर भर दिला. इतर मतदारसंघात त्या फारशा फिरकल्या नसल्याचे बोलले जात आहे.


..
प्रचारातील मुद्दे
उच्चशिक्षित आणि अभ्यासू खासदार म्हणून खासदार शिंदे यांची ओळख
विकासनिधी आणून विकासकामे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद
भाजप व मनसेची मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com