शेअर बाजाराचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना अटक

शेअर बाजाराचे आमिष दाखवणाऱ्या दोघांना अटक

शेअर बाजाराचे प्रलोभन दाखवणाऱ्या दोघांना अटक

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली. तब्बल ३ कोटी ७० लाख रुपयांची गुंतवणूक करून फसवणूक करणाऱ्या सलमान निजामुद्दीन खान (वय ३५) व प्रकाश करमशी भानुशाली (वय ३९) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही वाशी येथे राहणारे आहेत. या टोळीविरोधात हैदराबाद, गाझियाबाद व छत्तीसगडमध्ये सायबर फसवणुकीचे गुन्हे असल्याचेही पोलिसांनी सांगितले. सायबर पोलिसांनी या प्रकरणी बँकांना संपर्क साधून सतर्क केल्यामुळे ४६ लाख रुपयांची रक्कम गोठवण्यात यश आले.
या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे, ते वाशीमध्ये राहत असून फेब्रुवारी महिन्यामध्ये सोशल मीडियावरील जाहिरात पाहून त्यांनी सोशल मीडियावरील एक ग्रुप जॉईन केला. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविले. त्या वेळी त्यांनी ३ कोटी ७० लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची ती रक्कम २२ ते २३ कोटी रुपये नफा झाल्याचेही सायबर चोरट्यांकडून दाखवण्यात आले. मात्र ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता ती रक्कम काढता आली. त्यामुळे त्यांनी नंतर थेट पोलिसात तक्रार दाखल केली.

दुबईतून होते ऑनलाईन चोरी
अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी अनेक गरजू लोकांना पैशाचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून कागदपत्रे व सिमकार्ड घेत. त्यानंतर त्यांची कागदपत्रे दुबईमधील त्यांच्या साथीदारांना पाठवून लोकांची फसवणूक करत असल्याचे दोघांनी मान्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com