पियुष गोयल यांचा सहज विजय

पियुष गोयल यांचा सहज विजय

मुंबई, ता. ४ : अपेक्षेप्रमाणेच भाजप नेते पियूष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून अत्यंत सहज विजय मिळवला. त्यांना साडेसहा लाखांहूनही जास्त मताधिक्य मिळाले.
उत्तर मुंबई हा मुळात परंपरागत भाजपचा बालेकिल्ला असल्याने गोयल यांचा विजय सोपा होता. किंबहुना मुंबईच्या सहापैकी या एकमेव जागेवर भाजप खात्रीशीररीत्या आणि सहजपणे निवडून येणार. अन्य सर्व जागांवर महायुतीची अवस्था दोलायमान आहे, असे मतदानाच्या आधीच बोलले जात होते. त्याची तंतोतंत प्रचीती आज आली. गोयल यांनी पहिल्या फेरीपासूनच आपले प्रतिस्पर्धी काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यावर व्यवस्थित आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत गोयल यांना पाटील यांच्यापेक्षा जवळपास दुप्पट मते मिळाली. ही आघाडी त्यांनी उत्तरोत्तर वाढवत नेली. पाटील यांना कोणत्याही फेरीत आघाडी मिळाली नाही. मुळात गोयल यांची उमेदवारी पक्षाने महिनाभर आधीच जाहीर केल्यामुळे त्यांना प्रचाराला भरपूर वेळ मिळाला. त्यातच महाविकास आघाडीने उमेदवारही कच्चा दिला. विनोद घोसाळकरांसारखे शिवसेनेचे मातब्बर नेते थोडी तरी लढत देऊ शकले असते. मात्र, वातावरण बघून शिवसेनेनेदेखील ही जागा काँग्रेसला सोडून दिल्याने भाजपचा विजय सोपा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com