चारधम यात्रेच्या नावाखाली ६० हजारांचा गंडा

चारधम यात्रेच्या नावाखाली ६० हजारांचा गंडा

ठाणे, ता. ५ (वार्ताहर) : मित्राने चारधाम यात्रेसाठी विचारणा केल्यानंतर सितारासु सिंगाराम (६५) यांनी त्यासाठी होकार दिला. त्यानंतर मित्र अंजन गोस्वामी यांनी सूचवलेल्या सनप्रिया टुर्स एल.एल.पी. कंपनीचे चारधाम यात्रेचे आयोजक कंपनीशी सिंगाराम यांनी संपर्क साधला. आयोजकाने स्वस्तमधील पॅकेज सांगून त्यांच्याकडून ६० हजार रुपये बुकिंगचे घेतले. मात्र, कंपनीने अशा यात्रेचे आयोजन केले नसल्याचे समोर येताच सोमवारी (ता. ३ ) सिंगाराम यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी कंपनीचे मालक संदेश कानडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सितारासु सिंगाराम हे सेवानिवृत्त असून मालाड येथील धिरज सोलीटेवर चिंचोली बंदर रोड येथे राहण्यास आहेत. त्यां‍ना ११ मे रोजी गोस्वामी यांनी सनप्रिया टुर्स एल.एल.पी. कंपनीच्या चारधाम यात्रेचे २२ मे ते २ जूनपर्यंतच्या पॅकेजबाबत सांगत आम्ही जाणार आहे. तुम्ही येणार का? अशी विचारणा केली. त्या वेळी त्यां‍नी पत्नीशी चर्चा करून सहमती दर्शवून कंपनीशी संपर्क साधला. फोनवर संदेश कानडे होते. त्यांनी टूर्सची माहिती दिली. कंपनीद्वारे ३० लोकांचे चारधाम यात्रेचे पॅकेज असून दोन सदस्य कमी आहेत. त्यानुसार पॅकेज निवडून तक्रारदाराने बुकिंगची रक्कम कंपनीच्या खात्यावर पाठवले. तारीख जवळ आल्याने त्यांनी १९ मे रोजी फोन केला; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. गुगलवरून शोध घेऊन ठाण्यातील नौपाडा येथील कामठे हाऊस येथे पोहचले. चौकशीअंती कंपनीद्वारे कुठलीच टूर्सचे आयोजन केले नसल्याचे समोर आले. त्या‍ंनी त्वरित नौपाडा पोलिस ठाण्यात कानडेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com