सिग्नलमधील गोंधळामुळे 
प्रवाशांना पुन्हा मनस्ताप

सिग्नलमधील गोंधळामुळे प्रवाशांना पुन्हा मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील मेगाब्लॉक संपून तीन दिवस झाले तरी मध्य रेल्वेची सेवा रुळावर आलेली नाही. नव्‍याने बसवलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेतील गोंधळामुळे सलग तिसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. बुधवारी (ता. ५) परळ ते सीएसएमटीदरम्यान लोकल कासवगतीने धावत होत्या. १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे नोकरदारांना पुन्हा लेटमार्कला सामारे जावे लागले. प्रवाशांच्या संतप्त प्रतिकियेनंतर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यस्थापकांनी ‘एक्स’ अकाऊंटवरून प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १० व ११ च्या विस्तारीकरणासाठी १ जूनच्या मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आला. हा मेगाब्लॉक नियोजित वेळेनुसार रविवारी दुपारी संपला. या वेळी सीएसएमटी यार्डमध्ये नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा बसविण्यात आली; परंतु नव्या यंत्रणेतील गोंधळामुळे मेगाब्लॉक संपूनही लोकल सेवा रुळावर आलेली नाही. नवीन सिग्नल यंत्रणेत असलेले काही दोष आणि अडचणी दूर करण्यासाठी मध्य रेल्वे तीन दिवसांपासून प्रयत्न करत आहे. एक-दोन दिवसांत सिग्नल यंत्रणा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
..
लोकल एकामागोमाग उभ्या
तीन दिवसांपासून मध्य रेल्वेच्या जलद आणि धीम्या मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत. बुधवारी करी रोड ते सीएसएमटीदरम्यान लोकलचा वेग अत्यंत कमी झाल्याने गाड्या एकामागोमाग एक उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com