गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात

गोखले पूल आणि बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अंधेरी पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचे काम प्रगतिपथावर असून सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाशी गोखले पुलाची उंची जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे. उर्वरित कामे जलदगतीने करून हा पूल लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेसाठी खुला करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले.

पालिकेकडून वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) तसेच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली गोखले पुलाचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी आयुक्त भूषण गगराणी बुधवारी (ता. ५) अंधेरी येथील कामाच्या ठिकाणी भेट देत पाहणी केली. या पाहणी दौऱ्याच्या प्रारंभी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आयुक्त भूषण गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यान (हँगिंग गार्डन), सांताक्रुझ येथील लायन जुहू महापालिका बाल उद्यान (एरोप्लेन गार्डन) येथे भेट दिली. सांताक्रुझ येथील बाल उद्यानात गगराणी यांच्या हस्ते पुरातन गोरख चिंचेच्या झाडांचे रोपण करण्यात आले. दरम्यान, गोखले पूल प्रकल्पाच्या ठिकाणी कार्यरत अभियंत्यांशी आयुक्तांनी संवाद साधत उरलेली कामे जलदरीत्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दोन्ही पूल जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मुंबईकरांसाठी हा टप्पा लवकरच खुला करण्यात येणार आहे.


..
नागरिकांशी संवाद
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मलबार हिल येथील कमला नेहरू उद्यानाला भेटीप्रसंगी त्यांनी उद्यानात व्यायामासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. सोबतच त्यांनी जुहू येथील पालिकेच्या कूपर हॉस्पिटल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. येथे आलेल्या रुग्णांची विचारपूस करीत येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे रुग्णालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विविध सुविधांविषयी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com