हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार!

हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार!

हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करणार
मंत्री उदय सामंत यांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नसल्याची खंत व्यक्त करीत, प्रत्येक मतदारसंघाचा अहवाल तयार करण्यात येणार असून नेतेमंडळींचे प्रगतिपुस्तक तयार करून यात ज्या नेत्यांनी हलगर्जी केल्याचे निष्पन्न होईल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला. ठाण्यात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीने देशात ४०० पारचा, तर महाराष्ट्रात ४५ प्लस असा नारा दिला होता. त्यानुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सात खासदार निवडून आले आहेत. आम्ही अपेक्षित यशापर्यंत पोहचू शकलो नसलो, तरी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. या निवडणुकीच्या निमित्ताने मुस्लिम आणि दलित या दोन समाजांत तेढ निर्माण करण्यात इंडिया आघाडीला यश आले. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलतील, असा प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही प्रचार न करता विरोधकांना यश मिळाले. मुस्लिम आणि दलित मतांचे ध्रुवीकरण करून विरोधकांनी एक गठ्ठा मते मिळवली. आम्ही आता हा गैरसमज दूर करून येत्या विधानसभा निवडणुकीत व्याजासह सर्व परत करू, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
...
टक्केवारी जास्त
लोकसभा निवडणुकीत आम्हाला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षापेक्षा जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिरा घोषित केल्याचा तोटाही आम्हाला झाला; मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत ही काळजी घेऊन आम्ही लवकर उमेदवार जाहीर करू, असे सामंत म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीपूर्वी ईव्हीएमविरोधात ओरड केली होती. आता ज्या नऊ ठिकाणी त्यांचे खासदार निवडून आले आहेत, तिथे ते पुन्हा मतदान घेणार आहेत का, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com