अतिधोकायक इमारतीवर पालिका कारवाई करणार

अतिधोकायक इमारतीवर पालिका कारवाई करणार

अतिधोकादायक इमारतींना इशारा
महापालिका पाणी, वीजपुरवठा खंडित करणार

वाशी, ता. ५ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले असून अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असणाऱ्या सी-१ प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या ६२ इमारतींमध्ये विद्युत व पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे यांनी दिला आहे.
सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण ५२७ इमारती महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम २६४ अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. पालिकेने तीन प्रवर्गामध्ये इमारतींची रचना करण्यात आल्या आहेत. सी-१ प्रवर्गामध्ये ६२ इमारती आहेत. नवी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतींचे बांधकाम विनाविलंब तोडून टाकण्याबाबत महाराष्ट्र शासन, नगरविकास विभाग यांच्या ५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार लेखी सूचना व नोटीस देण्यात आल्या आहेत. ज्या इमारती या खाली करण्यात आल्या नाहीत, त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई करण्यात येणार असून सी-१ प्रवर्गातील इमारतीची विद्युत व जलजोडणी खंडित करण्यात येईल, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतींचे मालक अथवा भोगवटादार यांनी वेळीच पावले उचलावीत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
...
पावसाळा कालावधीत अतिधोकादायक झालेल्या इमारतींचा तथा घरांचा वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते. म्हणून नागरिकांकडून त्या इमारतींचा वापर तत्काळ थांबवावा; तसेच अतिधोकादायक इमारतीचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
- डॉ. राहुल गेठे, अतिक्रमण उपायुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com