लाच घेतल्याच्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत

लाच घेतल्याच्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अटकेत

सहायक पोलिस निरीक्षक लाचप्रकरणी अटकेत

तुर्भे, ता. ५ (बातमीदार) ः आरोपीला मदत करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अनुक्रमे सागर कुमार टकले आणि प्रज्ञेश कोठेकर अशी अटक करण्यात आलेल्या पोलिस कर्मचारी आरोपींची नावे आहेत.
पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे त्याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यामधील तक्रारदार व्यक्तीच्या काकावर कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे एक गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात काकांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणीत मदत करणे, तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करणे याकरिता तक्रारदाराकडे टकले यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. याविषयी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पडताळणीदरम्यान टकले यांनी तडजोडीअंती ४० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. ही रक्कम प्रज्ञेश कोठेकर यांच्याकडे देण्यास सांगितली होती. त्यानुसार रक्कम घेण्यासाठी कोठेकर खारघर येथे आले असता पोलिसांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com