नाल्यातील गाळ रस्त्यावर आढळल्यास कारवाई

नाल्यातील गाळ रस्त्यावर आढळल्यास कारवाई

डोंबिवली, ता. ६ (बातमीदार) ः कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे; पण दर वर्षी नालेसफाई झाल्यानंतर तो गाळ रस्त्यालगत ठेवला जातो. रस्त्यालगत गाळ आढळून आल्यास कंत्राटदारांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी कंत्राटदाराला दिला.
महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामाकरिता ३ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दहा कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. नालेसफाईच्या कामाला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मंजुरी दिली होती. त्यामुळे शहरात कामे सुरू आहेत. दरम्यान कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड आणि शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी नालेसफाईच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली होती. लोकप्रतिनिधींच्या पाहणी दौऱ्यानंतर आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कंत्राटदाराला रस्त्यालगतचा गाळ उचलण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com