ठाण्यात पाच वाहनांचा विचित्र अपघात

ठाण्यात पाच वाहनांचा विचित्र अपघात

ठाण्यात पाच वाहनांचा विचित्र अपघात
दोघे जखमी; एक तास वाहतुकीची कोंडी

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) ः ठाण्याच्या विवियाना मॉलजवळ मुंबई-नाशिक वाहिनीवर आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातात जीवितहानी झालेली नाही; मात्र अपघातामुळे तब्बल एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
घटनास्थळी राबोडी पोलिस कर्मचारी, वाहतूक पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, घनकचरा विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी मदतकार्य करीत तीन टोईंग व्हॅनच्या माध्यमातून वाहने बाजूला केली. अपघातात कारचालक व टेम्पोचालक यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. टेम्पोचालक सुनील रथोड हे मुंबई-माणकोली असा प्रवास करीत होते. ट्रकचालक भोलासिंग मुंबईकडून भिवंडीला निघाले होते. डंपरचालक गोपाळ सिंग हे वागळे येथून भिवंडीकडे निघाले होते. टेम्पोचालक भारत चव्हाण हे मुंबई ते माणकोलीकडे निघाले होते आणि कारचालक दीपक सिंग हे मुंबईवरून भिवंडीला निघाले होते. ही पाच वाहने अज्ञात कारणाने एकदुसऱ्‍यावर धडकली आणि विचित्र अपघात घडला. या अपघातात टेम्पोचालक भारत चव्हाण (वय ४७) यांच्या डोक्याला, छातीला व पायाला दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालक दीपक सिंग (वय ३५) यांच्या डोक्याला, पायाला, हाताला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
...
अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्वपदावर
अपघातामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या माजिवडा ब्रिजवर वाहतुकीची कोंडी झाली होती. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहने अस्ताव्यस्त पडल्याने वाहतूक खोळंबली. घटनास्थळी वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने त्वरित पाच टोईंग व्हॅनचा वापर करीत अपघातग्रस्त पाचही वाहने टोईंग करून ब्रिजवरून सुरक्षित स्थळी नेली. त्यानंतर वाहतूक एक तासानंतर हळूहळू पूर्वपदावर आणण्यात आली. यासाठी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी अथक परिश्रम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com