पालिकेसमोर लावलेल्या ‘त्या’ फलकाची शहरात चर्चा

पालिकेसमोर लावलेल्या ‘त्या’ फलकाची शहरात चर्चा

ठाणे, ता. ६ : ठाणे लोकसभेत राजन विचारे यांचा पराभव करून नरेश म्हस्के यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांना शुभेच्छा देणारे फलक सर्वत्र लावण्यात आले आहे. मात्र, या सगळ्यात पालिका मुख्यालयासमोर भाजप मित्रपक्षाकडून लावलेल्या फलकाची जोरदार चर्चा सुरू आहे. या फलकावर ‘आमचे मित्र दिसणार नाहीत महापालिकेत, ते आता बसणार थेट संसदेत’ अशा आशयाचे मजकूर लिहिण्यात आला आहे. या मजकुरामुळे आता पालिकेत लक्ष देऊ नका, दिल्लीकडे द्या असेच काहीसे सांगण्याचा प्रयत्न तर केला नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ठाणे लोकसभेच्या पार पडलेल्या निवडणुकीत निष्ठा विरुद्ध गद्दार अशी लढाई झाली. यामध्ये नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांचा २ लाख १७ हजार ३ मतांनी पराभव केला. म्हस्के यांच्या विजयानंतर त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरात सर्वत्र झळकू लागले. दुसरीकडे विचारे यांचाही चंदनवाडी शाखेजवळ एक बॅनर झळकला आहे, ‘त्यात गड आला; पण सिंह गेला’ असे त्यात म्हटले आहे. त्यामुळे या बॅनरचीही चर्चा सुरू आहे. अशातच दुसरीकडे ठाणे पालिका मुख्यालयाजवळ लावलेल्या फलकावरून शहरात एकच चर्चा रंगू लागली आहे. या फलकावर भाजप आणि शिंदे सेनेच्या माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
‘आमचे मित्र दिसणार नाहीत ठाणे महापालिकेत, ते आता बसणार थेट संसदेत’, ‘ठाण्याचा उंबरठा ओलंडण्यासाठी त्यांना शुभेच्छा’ असा आशय त्या फलकावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हस्केविषयी सांगताना ‘आता महापालिकेकडे लक्ष देऊ नका, दिल्लीकडे द्या’ असे सूचक विधान केले होते. त्यात आता लागलेल्या बॅनरवरही तशाच प्रकारचा आशय आल्याने माजी नगरसेवकांनी नेमके काय म्हणायचे, हे त्यातून अधोरेखीत होत आहे. मात्र, हा फलक अवघ्या २४ तासांत काढून टाकण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com