होर्डिंग कोसळून वयोवृद्ध जखमी

होर्डिंग कोसळून वयोवृद्ध जखमी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः मालाडच्या पश्चिमेकडील लिबर्टी रोडलगत असलेल्या नेहरू क्रीडांगणाच्या बाजूला बुधवारी रात्री ८ च्या सुमारास होर्डिंग कोसळले. या अपघातात महेंद्र भिवा कुर्ले (६२) जखमी झाल्याने मालाड पोलिस ठाण्यात विकासकाविरोधात गुन्हा दाखल आहे.
मालाड पश्चिमेला जवाहरलाल नेहरू क्रीडांगणाच्या बाजूला, लिबर्टी रोड, जय किरण कन्स्ट्रक्शन साईटवर १० बाय २५ लांबीचे होर्डिंग कोसळले. यावेळी मुलगा अथर्वसह उद्यानातून बाहेर पडणाऱ्या महेंद्र कुर्ले यांच्या डोक्याला किरकोळ मार लागला. याप्रकरणी मालाड पोलिस ठाण्यात विकासकाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
------------------------------------------
मालाड पश्चिमेतील नऊ होर्डिंगधारकांनी पालिकेच्या परवानगीची कागदपत्रे सात दिवसांत सादर करावीत, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे.
- किरण दिघावकर, उपायुक्त, पी-उत्तर विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com