सफाई कर्मचाऱ्‍याने केली घरफोडी

सफाई कर्मचाऱ्‍याने केली घरफोडी

सफाई कर्मचाऱ्‍याने केली घरफोडी

भाईंदर (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्‍या सफाई कर्मचाऱ्‍याने भाईंदर येथे लाखो रुपयांची घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. या कर्मचाऱ्‍याला अटक करण्यात आली असून त्याने पालघर जिल्ह्यातही याच पद्धतीने अनेक घरफोड्या केल्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. अजय पाटील असे त्याचे नाव आहे.
भाईंदर येथे राहणारी महिला सकाळी साडेअकराच्या सुमारास आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली असता तिच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील एक लाख ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक व्यक्ती संशयितरीत्या फिरत असून त्याने मिरा-भाईंदर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्‍याचा गणवेश घातला असल्याचे दिसून आले. या फुटेजमधील सफाई कर्मचाऱ्‍याचे छायाचित्र महापालिकेच्या मुकादमाला दाखवले असता त्याने आरोपीला ओळखले व त्याचे नाव अजय पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली व त्याच्याकडील एक लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याच्या चौकशीत आरोपीने पालघर जिल्ह्यातील सफाळा व केळवा परिसरात अशाच प्रकारचे सात गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवडी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com