अमित सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

अमित सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
Published on: 

अमित सरैया यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
कोकण पदवीधर निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षदेखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी या पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे. शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul election 2026 BJP Mahayuti candidates nomination
Kolhapur Gokul Election 2026 133 candidates 205 nomination forms
Gokul Milk Union Election Vishwas Patil Files Nomination With Five Others 15 Candidates Submit 19 Forms in Kolhapur
Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com