राम कदमांची जागा धोक्यात

राम कदमांची जागा धोक्यात

ईशान्य मुंबई
विजय- संजय दिना पाटील, शिवसेना (उठाबा)- ४,२१,०७६
पराभूत- मिहीर कोटेचा, भाजप- ४,५०,९३७

राम कदमांची जागा धोक्यात
उबाठा आमदार कोरेगावकरांची कामगिरी ढेपाळली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ८ ः ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुलुंड, विक्रोळी, भांडुप पश्चिम, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि शिवाजीनगर मानखुर्द या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या सहापैकी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी राम कदम यांच्या घाटकोपर पश्चिमसह विक्रोळी, भांडुप पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्द या चार मतदारसंघांत निर्णायक आघाडी घेतली. तर भाजपच्या मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलुंड आणि घाटकोपर पूर्व या दोन मतदारसंघांत आघाडी घेतली. मात्र, मुस्लिमबहुल शिवाजीनगर मानखुर्दमध्ये मिळवलेल्या प्रचंड आघाडीमुळे संजय दिना पाटील यांना विजयापर्यंत पोहोचता आले आहे.

या आमदारांना धोक्याची घंटा

मतदारसंघ- घाटकोपर पश्चिम
आमदार- राम कदम, भाजप
या मतदारसंघात संजय दिना पाटील यांनी १५ हजार ७७२ मतांची आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीतही पिछाडी कापण्याचे खडतर आव्हान राम कदम यांच्यापुढे राहणार आहे.
एकूण मतदान - १,५१,०३३
संजय पाटील- ७९,१४२
मिहीर कोटेचा- ६३,३७०

मतदारसंघ- भांडुप पश्चिम
आमदार- रमेश कोरगावकर, शिवसेना (उबाठा)
मतदारसंघात शिवसेना (उबाठा)चा आमदार असताना संजय पाटील यांना केवळ तीन हजार ४५ मतांची किरकोळ आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आमदार रमेश कोरगावकर यांच्यासाठी विधानसभेची लढाई तेवढी सोपी राहिलेली नाही.
एकूण मतदान  - ९,२६,७३२
संजय पाटील-  ४,२१,०७६
मिहीर कोटेचा- ४,५०,९३७

या आमदारांनी किल्ला राखला

मतदारसंघ- मुलुंड
आमदार- मिहीर कोटेचा, भाजप
गुजरातीबहुल असलेल्या या मतदारसंघात मिहीर कोटेचा यांनी स्वतःला ६६ हजार ४४२ मतांची निर्णायक आघाडी मिळवून दिली आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व कोटेचा करतात. त्यामुळे पराभूत झाले तरी त्यांना विधानसभा जिंकणे कठीण नाही.
एकूण मतदान- १,७९,७४६
मिहीर कोटेचा - १,१६,४२१
संजय पाटील- ५५,९७९
....
मतदारसंघ- विक्रोळी
आमदार- सुनील राऊत, शिवसेना (उबाठा)
या मतदारसंघात संजय पाटील यांना तब्बल १५,८६५ हजारांची लिड मिळवून दिली. या लिडमुळे संजय पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यास मदत केली.

एकूण मतदान- १,२९,७७६
संजय पाटील - ६८,६७२
मिहीर कोटेचा - ५२,८०७

मतदारसंघ- घाटकोपर पूर्व
आमदार- पराग शाह, भाजप
या मतदारसंघातून भाजपच्या मिहीर कोटेचा यांना ३३ हजार ६०९ मतांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे पराग शाह यांचा विधानसभेचा मार्ग सोपा झाला आहे.
एकूण मतदान- १,४१,४०६
संजय पाटील- ४९,६२२
मिहीर कोटेचा- ८३,२३१

मतदारसंघ- शिवाजीनगर मानखुर्द
आमदार- अबू आझमी, समाजवादी पार्टी
या मुस्लिमबहुल मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाच्या संजय पाटील यांना सर्वाधिक ८७ हजार ९७१ मतांची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी निर्णायक ठरली असून संजय पाटील यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
एकूण मतदान- १,५६,४५८
संजय पाटील - १,१६,०७२
मिहीर कोटेचा - २८,१०१

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com