महानिर्मितीच्या सौर प्रकल्पांना मुदतवाढ

महानिर्मितीच्या सौर प्रकल्पांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : सध्या सर्वच वीज कंपन्यांकडून सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात असला तरी महानिर्मितीच्या सौर प्रकल्पासाठी मात्र जमीन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सहाशे मेगावाॅटच्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सुमारे तीन हजार एकर जमीन मिळत नसल्याने इच्छुक कंपन्यांना निविदा भरण्यास मुदतवाढ देण्याची नामुष्की महानिर्मितीवर ओढावली आहे.
काेळशावरील औष्णिक वीज प्रकल्पांच्या तुलनेत सौरऊर्जा प्रकल्पात तयार होणारी वीज महागडी ठरते. त्यातच औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना कोळसा जाळावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीला प्रोत्साहन देत आहे. त्यानुसार महानिर्मितीने नुकत्याच सहाशे मेगावाॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारून वीजपुरवठा करण्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून २८ मेअखेर निविदा मागल्या होत्या. या प्रकल्पासाठी संबंधित कंपन्यांनी जमिनीचा शोध घेणे आवश्यक आहे. मात्र, त्यांना निविदा सादर करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पुरेशी जमीन उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे सौर प्रकल्प उभारण्यासाठी निविदा आल्या नव्हत्या. त्याची दखल घेत महानिर्मितीने निविदा सादर करण्यास मुदतवाढ दिल्याची माहिती महानिर्मितीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com