ठाण्यात तीन तासात १७.८८ पावसाची नोंद

ठाण्यात तीन तासात १७.८८ पावसाची नोंद

ठाण्यात तीन तासांत १७.८८ मिमी पावसाची नोंद
नागरिकांना दिलासा; शहर परिसरात कुठेही वित्तहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने ठाणे शहरात शनिवारी पहाटे दमदार हजेरी लावली. अवघ्या तीन तासांत १७.८८ मिमी पावसाची नोंद झाली. गर्मीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना पाऊस झाल्याने दिलासा मिळाला आहे. या दरम्यान शहरात कुठेही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचेही ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाची पहिल्या एक तासात ७.३३ मिमी नोंद झाली; तर दुसऱ्या एक तासात १०.३६ मिमी तसेच त्याच्या पुढील तासाभरात अवघ्या ०.२९ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण १७.८८ मिमी पाऊस झाल्याचेही सांगण्यात आले. आतापर्यंत २५.०५ इतका पाऊस ठाण्यात बसरल्याची नोंद असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com