तळोजा कारागृहात घेऊन जाताना आरोपीचे पलायन

तळोजा कारागृहात घेऊन जाताना आरोपीचे पलायन

तळोजा कारागृहात घेऊन जाताना आरोपीचे पलायन
पनवेल, ता. ८ (बातमीदार) : शिरूर पोलिस ठाणे येथील गुन्ह्यातील कायदेशीर ताब्यात असलेला आरोपी मुजाहिद गुलजार खान (वय २८) याला तळोजा कारागृहात घेऊन जात असताना त्याने पलायन केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी मुजाहिद खान व अन्य दोन आरोपींना खोपोली पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना तळोजा मध्यवर्ती कारागृह येथे ताबा घेऊन त्याला शिरूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिस आरोपींना घेऊन तळोजा कारागृहाच्या दिशेने निघाले. ५ जून रोजी रात्रीच्या वेळी खारघरमध्ये तळोजा जेल रोड, हाईड पार्क सोसायटीसमोरून तीन आरोपींना घेऊन जात असताना मुजाहिद गुलजार खान याने पोटात दुखत असल्याचे सांगत लघुशंका करण्याचे कारण सांगितले. त्या वेळी पोलिसांनीही गाडी थांबवली. त्या वेळी पोलिस शिपाई विकी यादव हा मुजाहिद याला घेऊन खाली उतरला, तर पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील दोन आरोपींसह गाडीतच बसून राहिले. त्या वेळी मुजाहिद खान हाईड पार्क सोसायटीच्या दिशेने पळून जाताना दिसला. त्या वेळी विकी यादव यांनी त्याचा पाठलाग केला; मात्र मुजाहिद खान अंधाराचा फायदा घेऊन नाल्यावरून उडी मारून पसार झाला. या वेळी विकी यादव नाल्यावरून पाय घसरून पडल्याने जखमी झाले आहेत. त्यानंतर एकनाथ पाटील यांनी दोन आरोपींना तळोजा जेलमध्ये दाखल करून याप्रकरणी खारघर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com