तळोजामधून सात महिन्याच्या बाळाचे अपहरण

तळोजामधून सात महिन्याच्या बाळाचे अपहरण

तळोजामधून सात महिन्यांच्या बाळाचे अपहरण
आरोपीचा शोध सुरू; झोपडीत घुसून पळवले

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : तळोजा एमआयडीसी भागातील झोपडीत राहणाऱ्या एका महिलेच्या ७ महिन्यांच्या मुलाचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ७) उघडकीस आली. तळोजा पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.
या घटनेतील तक्रारदार रविना इस्राईल अन्सारी (वय २२) ही महिला व तिचा पती तळोजा एमआयडीसीतील असाही ग्लास कंपनी शेजारी असलेल्या झोपडीमध्ये राहतात. रस्त्यावर फुगे विकून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रविना यांनी आपल्या सात महिन्यांच्या बाळाला झोपडीमध्ये झोपवून त्या झोपडीबाहेर जेवण करण्यासाठी बसल्या होत्या. त्यावेळी अज्ञाताने अंधाराचा फायदा घेऊन झोपडीमध्ये झोपवलेल्या बाळाला घेऊन पलायन केले. काही वेळानंतर बाळाच्या आईला हे लक्षात येताच त्यांनी परिसरात चौकशी केली, मात्र बाळ कुठेच आढळून आले नाही.
बाळाची शोधाशोध करूनही सापडले नसल्याने त्यानंतर त्यांनी मध्यरात्री तळोजा पोलिसांत बाळाचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनीही तात्काळ तपासाला सुरुवात केली. या घटनेतील बाळाचा रंग गोरा असून तो अंगाने सडपातळ आहे. तसेच त्याचे नाक सरळ व केस भुरकड काळे आहेत. बाळाचा चेहरा गोल असून त्याच्या दोन्ही हातांमध्ये काळ्या रंगाचे फ्लास्टिकचे कडे असून त्याच्या उजव्या हातात धाग्यात गुंफलेली काळ्या मण्यांची माळ आहे. या वर्णनाचे बाळ कुणाला आढळून आल्यास त्याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com