महाड, पोलादपूरमध्ये जोरदार पाऊस

महाड, पोलादपूरमध्ये जोरदार पाऊस

महाड, पोलादपूरमध्ये जोरदार पाऊस
नागरिकांना दिलासा, शेतीच्या कामांना येणार वेग

पोलादपूर, ता. ८ (बातमीदार) : गेल्या दोन महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या महाड- पोलादपूरकरांना शनिवारी (ता. ८) झालेल्या पावसाने दिलासा दिला. दोन दिवसांपूर्वी गोवामार्गे कोकणात मॉन्सून दाखल झाला, मात्र गुरुवारीच (ता. ६) रायगड जिल्ह्यात तुरळक हजेरी लावली होती. परिसरात थोड्या फार प्रमाणात पडलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्म्याचे प्रमाण आणखी वाढले होते. शनिवारी बराच वेळ महाड, पोलादपूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच शेतकरीवर्गदेखील या पावसामुळे सुखावला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे मात्र ग्रामीण परिसरात आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com