फेडरल बँक टाटा एआयए बँक इन्शुरन्ससाठी करार

फेडरल बँक टाटा एआयए बँक इन्शुरन्ससाठी करार

फेडरल बँक टाटा एआयए बँक इन्शुरन्ससाठी करार

मुंबई, ता. ९ : खासगी क्षेत्रातील एक प्रमुख बँक असलेल्या फेडरल बँकेने देशातील प्रमुख जीवन विमा कंपनी असलेल्या टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीसोबत आपल्या ग्राहकांना विमा सेवा मिळावी, यासाठी सहकार्य केले आहे.

या करारामुळे फेडरल बँकेच्या खातेदारांना टाटा एआयए लाइफच्या वेगवेगळ्या विमा योजनांचा लाभ घेता येईल. फेडरल बँकेच्या देशभर शाखा असल्याने या करारामार्फत टाटा एआयएला आपला आणखी विस्तार करता येईल. मुदत विमा, बचत आणि संपत्ती निर्माण योजना, निवृत्ती तसेच पेन्शन योजना आदी प्रकारच्या विमा योजना टाटा एआयएकडे आहेत. त्याचबरोबर मोठे जीवन सुरक्षा कवच, शेअर बाजाराशी निगडित परतावा, आरोग्य विमा आदींसाठी तिप्पट लाभ देणाऱ्या टाटा परमरक्षकसारख्या नवीन योजनांचा लाभही बँक ग्राहकांना मिळेल, ही माहिती फेडरल बँकेच्या कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com