गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
मुंबई, ता. ९ ः शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग लोअर परळ व उद्दिष्‍ट प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वरळी, शिवडी विभागातील दहावी, बारावी परीक्षेत ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्‍य भेट म्‍हणून देण्यात येणार आहे. तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमदेखील पार पडेल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा पूर्व, राणीबाग येथे रविवारी (ता. ३०) सकाळी साडे नऊ ते दुपारी दोन या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने क्‍यूआर कोड अथवा https://forms.gle/iGY९PxYW३GvFNJqv६ लिंक देण्यात आली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली माहिती भरून द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७३७८९७७९६९/९८१९५९११५० या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com