इमारतीचा स्लॅब कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू

इमारतीचा स्लॅब कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू
विक्रोळी पश्चिमेतील घटना

घाटकोपर, ता. १० (बातमीदार)ः मुंबईच्या विक्रोळी पश्चिम येथील टाटा पॉवर हाऊसच्या एका साईटजवळ असलेल्या ‘कैलास बिझनेस पार्क’मध्ये काम सुरू असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. काल मध्यरात्री एकच्या सुमारास ही दुर्घटना घडली. १० वर्षीय मुलगा सिक्युरिटी गार्ड असलेल्या वडिलांना जेवण देण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली.
मुसळधार पाऊस असल्याने हा मुलगा वडिलांसोबत होता. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब त्यांच्यावर कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. नागेश रेड्डी (३८) आणि रोहित रेड्डी (१०) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने मुंबई उपनगरात चांगलीच मुसंडी मारली. तासभर पडणाऱ्या पावसाने रस्त्यावर पाणी साचले होते, तर विक्रोळीत मुसळधार पावसाचा फटका एका इमारतीला बसला. येथील बिझनेस पार्कमध्ये पाच मजली इमारतीचे काम सुरू होते. रविवारी पाऊस सुरू असतानाच रात्री अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून यात आसऱ्यासाठी उभे असलेले पिता-पुत्र अडकून पडले होते. त्याच वेळी स्लॅब कोसळला. स्थानिकांनी त्या दोघांना खासगी वाहनातून राजावाडी रुग्णालयात नेले; मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com