Mutual Funds
Mutual Fundssakal

Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची ऊर्जा

मे महिन्यात भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात एकूण ३४ हजार ६९७ कोटी रुपये गुंतवले, तर याच महिन्यात गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्येही वीस हजार ९०४ कोटी रुपये गुंतवले.

मुंबई : मे महिन्यात भारतीय गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात एकूण ३४ हजार ६९७ कोटी रुपये गुंतवले, तर याच महिन्यात गुंतवणूकदारांनी एसआयपीमध्येही वीस हजार ९०४ कोटी रुपये गुंतवले. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडस ऑफ इंडियाने (ॲम्फी) वरील माहिती दिली आहे. मे महिन्यात जमा झालेली रक्कम ही एप्रिलमध्ये जमा झालेल्या रकमेपेक्षा ८३.४२ टक्के जास्त आहे. हा एक विक्रम असल्याचे सांगितले जात आहे.

गुंतवणुकीस खुल्या असलेल्या इक्विटी फंडात गेले सलग ३९ महिने मोठ्या प्रमाणावर रक्कम येत राहण्याचा हा एक विक्रमच झाला आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात गुंतवणूकदारांचा विश्‍वास, तसेच विकासप्रक्रियेवरील त्यांची खात्री दिसते, असे सांगितले जाते आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात लोकसभा निवडणुका असतानाही अनिश्‍चिततेकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कायम ठेवली.
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनची (एसआयपी) मे महिन्यातील गुंतवणूकही २०,९०४ कोटी रुपयांवर गेली. एप्रिलमध्ये हा आकडा २०,३७१ कोटी रुपये होता. एप्रिलमध्ये प्रथमच या गुंतवणुकीने वीस हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. मे महिन्यातच ४९ लाख ७४ हजार ४०० नव्या एसआयपी नोंदविल्या गेल्या.

ओपन एंडेड म्युच्युअल फंडात एप्रिलमध्ये १८ हजार ९१७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा आता परिस्थिती सुधारल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. निश्चित उत्पन्न योजनांत यावेळी ७७ टक्के कमी गुंतवणूक झाली. तरीदेखील हा आकडा ४२ हजार २९४ कोटी रुपये होता. डेट फंडात आणि त्यातही विशेषत: लिक्विड फंडात २५ हजार ८७३ कोटी रुपयांची आवक वाढली आहे; तर शेअर कर्जरोखे आणि वस्तू अशा तिन्ही प्रकारांत गुंतवणूक करणाऱ्या हायब्रिड फंड गटात १७ हजार ९९० कोटी रुपये आले. अर्बिट्राज फंड गटात १२ हजार ७५८ कोटी रुपये आले. इंडेक्स फंडामध्ये चार हजार ४९० कोटी रुपये आले, तर गोल्ड ईटीएफ फंडांना ८२७ कोटी रुपये मिळाले. मे महिन्यात नऊ ओपन एंडेड स्कीम आल्या, त्यात लोकांनी १० हजार १४० कोटी रुपये गुंतवले.
..............................................................
कोणत्या फंडात किती गुंतवणूक
फंड - गुंतवणूक
सेक्टोरल-थिमॅटिक : १९,२१३ कोटी
स्मॉल कॅप : २,७२४ कोटी
मिड कॅप : २,६०५ कोटी
लार्ज कॅप : ६६३ कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com