करिअर मार्गदर्शन शिबिरे  पुन्हा सुरू

करिअर मार्गदर्शन शिबिरे पुन्हा सुरू

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती
करिअर मार्गदर्शन शिबिर पुन्हा सुरू
मुंबई, ता. १० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत मंगळवार (ता. ११) पासून पुन्हा एकदा छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राज्यभर सुरू करण्यात आली आहे.
कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या शिबिराचे ऑनलाईन पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. औंधच्या शासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत पंडित भीमसेन जोशी सभागृहात उद्‌घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात ३५० ठिकाणी हा कार्यक्रम रावबवण्यात येणार असून, या माध्यमातून युवकांना योग्य करिअर आणि शिक्षणाच्या संधी निवडण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकांचेही करिअरविषयक विविध संधींसंदर्भात समुपदेशन केले जाईल.
दहावी, बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण आणि अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया, कालमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना माहिती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवरील माहिती मिळेल. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. यासाठी विद्यार्थी स्थानिक आयटीआयसोबत संपर्क साधू शकतात, असे लोढा यांनी सांगितले.
करिअर निवडताना कौशल्य प्रशिक्षण तितकेच महत्त्वाचे आहे, या उद्देशाने मार्गदर्शनाबरोबरच कौशल्य विकास विभागाद्वारे एक हजार महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विदेशात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रत्येक महसूल विभागात एक कौशल्य विकास प्रबोधिनी उभारण्यात येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com