गुंतवणुकीच्या नावाने ३५ लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या नावाने ३५ लाखांचा गंडा

गुंतवणुकीच्या नावाने ३५ लाखांचा गंडा
मालाडची घटना; महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
अंधेरी, ता. १० (बातमीदार) ः व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने सुमारे ३५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सौम्या राकेश भारद्वाज या महिलेविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या महिलेने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, याचा पोलिस तपास करत आहेत.
तक्रारदार महिला मालाडला राहत असून तिच्या पतीचा कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्यावर्षी त्यांची सौम्याशी ओळख झाली होती. तिने तिचा गारमेंटसह सुपर मार्केटचा व्यवसाय असल्याचे त्यांना तिच्या व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना सात ते आठ टक्के व्याजाचे आमिष दाखविले होते. त्यामुळे या महिलेच्या पतीसह मित्रांनी तिच्या व्यवसायात ५९ लाख २३ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. तिने त्यांना सुमारे २३ लाख रुपये व्याज म्हणून परत केले होते, मात्र नंतर तिने व्याज देणे बंद केले होते. याबाबत चौकशी केली असता सौम्या हिचा कुठलाही गारमेंटसह सुपर मार्केटचा व्यवसाय नसल्याचे त्यांना समजले. पैशांची मागणी केल्यास त्यांना बोगस ड्रग्जच्या गुन्ह्यात अटक करण्यास प्रवृत्त करू, अशी धमकी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com