वृक्ष प्राधिकरणाकडून १० नियंत्रण कक्ष स्थापन

वृक्ष प्राधिकरणाकडून १० नियंत्रण कक्ष स्थापन

वसई, ता. ११ (बातमीदार) : पावसाळ्यात वादळी वारे वाहून सोसायट्यांतील खासगी जागेतील मोठे वृक्ष उन्मळून पडणे अथवा त्यांच्या फांद्या तुटणे आदी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिककडून प्रभाग समितीनिहाय वृक्ष प्राधिकरण विभागाचे १० नियंत्रण पथक स्थापन करण्यात आले आहेत. वृक्ष उन्मळून पडल्यास संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पावसाळ्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडत असतात. या वेळी अनेकदा मालमत्तेची हानी होते, रस्त्यावर झाड पडल्यास वाहतूक ठप्प होते. या वेळी महापालिकेकडून वृक्ष बाजूला करण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाते. पावसाळ्यात अशा घटना घडू शकतात, यासाठी नागरिकांना सतर्क करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र १० कक्ष तयार करण्यात आले असून संपर्क क्रमांकदेखील जाहीर केले आहेत.

सोसायटीतील खासगी जागेतील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधल्यास त्वरित दखल घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पावसाळ्यात वृक्षांसबंधांत काही समस्या उद्‍भवल्यास नागरिकांनी वसई-विरार महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अथवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा. नागरी समस्यांची तत्काळ उकल करण्यात येईल.
- प्रियंका राजपूत, उपायुक्त, वृक्ष प्राधिकरण विभाग

विभाग कार्यालय कर्मचारी वृक्ष प्राधिकरण उद्यान विभाग अग्निशमन विभाग
ए बोळिंज ९८६०२९६४८४ ९८३४३८४५९३ ७०८३१३७१४५ ८८८८८६४२८३
बी विरार पूर्व ९२२१२३२४९४ ९८३४३८४५९३ ८४४६००५५६८ ७७७५०४२२००
सी-चंदनसार ९६०७७४८२२१ ९८३४३८४५९३ ९२२६७७२१११ ८६६९९७६१०१
डी आचोळे ९८९०८९७३१४ ८१०४४७१७०९ ९७६३५०१७९० ८८८८८६४२९७
ई नालासोपारा ९२७३८७७४५२ ९३२२५२४३३६ ८०८०४२०८७९ ७७७५०४२२००
फ धानिव ९२८४५२५८८७ ९८३४३८४५९३ ८०८०९०३०३७ ८८८८८६४२९७
जी, एच ७७७५९८९६४२ ७३८७४२९०८३ ८१०४४७१७०९ ९१३७१६२६०३
आय वसई ७९७२१८६७७५ ८१०४४७१७०९ ८१४९७०५६९९ ८८८८८६४२७५

मुख्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दिवाणमन, वसई पश्चिम
०२५-०२३३४५४६, २३३४५४७, ७०५८९११९२५, ७०५८९१११२५, ८४४६४२७६४३

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com