परदेशी फिरण्यासाठी गेल्यावर 
कुटुंबाचे चोरट्याने केले घर साफ

परदेशी फिरण्यासाठी गेल्यावर कुटुंबाचे चोरट्याने केले घर साफ

डोंबिवली, ता. ११ : एमआयडीसीतील एक कुटुंब उन्हाळी पर्यटनासाठी परदेशात फिरायला गेले, मात्र हे पर्यटन त्यांना चांगलेच महागात पडले. हे कुटुंब युरोपात फिरण्यासाठी जाताच चोरट्याने त्यांच्या घरात शिरून तिजोरीतील साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी भागात मिलाप नगरमधील सुनील पाटणकर यांच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे. त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पाटणकर हे कुटुंंबीयांसमवेत युरोपमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत. बंगला बंद असल्याचा अंदाज घेत चोरट्याने शनिवारी (ता. 8) मध्यरात्री स्वयंपाक घराच्या लोखंडी जाळ्या कटरने तोडत खिडकीतून आत प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी कपाटातील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा एकूण पाच लाख ४५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. पाटणकर यांच्या घरात चोरी झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी शेजाऱ्यांना समजला. ही माहिती तातडीने त्यांचे नातेवाईक चौधरी यांना देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com