पालिकेचे ७२५ कोटी रुपये ‘खड्यात’च

पालिकेचे ७२५ कोटी रुपये ‘खड्यात’च

पालिकेचे ७२५ कोटी रुपये ‘खड्यात’च
रस्त्यांची दुर्दशा जैसे थे; दोन वर्षांत रस्तादुरुस्तीसाठी खर्च

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : गेल्या दोन वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांसाठी पालिकेने ७२५ कोटी रुपये खर्च केले; मात्र त्या खड्ड्यांचे आता मोठ्या पावसाआधीच दशावतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच पालिका सतर्क झाली आहे.
पावसाळ्यापूर्वी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दर वर्षी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट दिले जाते. गेल्या वर्षीही पावसाळ्यापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी २२५ कोटी रुपये; तर मास्टिक असल्फाटद्वारे रीसरफेसिंगद्वारे रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी सुमारे २०० कोटी असे एकूण ४२५ कोटी रुपये खड्डे आणि रस्त्यांसाठी खर्च केले.
यंदाच्या पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत; मात्र तरीही मुंबईतील रस्त्यांची चाळण होते. खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी तब्बल ७२५ कोटी रुपये खर्च झाले असले, तरी खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ सुटले नाही.- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी- रायगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com