‘म्हाडा’च्या जागेवरील होर्डिंग होणार हद्दपार

‘म्हाडा’च्या जागेवरील होर्डिंग होणार हद्दपार

‘म्हाडा’च्या जागेवरील होर्डिंग होणार हद्दपार
६० होर्डिंगधारक कंपन्यांना नोटीस, परवानगी घेतलीच नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : घाटकोपर येथील बेकायदा होर्डिंगने १७ जणांचे बळी घेतल्यानंतर मुंबईतील होर्डिंगचा प्रश्न अजेंड्यावर आला. त्याची दखल घेत म्हाडाने आपल्या जागेवर असलेल्या होर्डिंगची झाडाझडती सुरू केली असून ६२ पैकी ६० होर्डिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे. सदरची होर्डिंग संबंधित कंपन्यांनी न हटवल्यास स्वतः उखडून टाकण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे म्हाडाच्या जागेवरील बेकायदेशीर होर्डिंग हद्दपार होणार असल्याचे निश्चित केले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी म्हाडाचे भूखंड आहेत. ते वेगवेगळ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या, संस्थांच्या ताब्यात असले तरी त्या जागेची मूळ मालकी म्हाडाची आहे. म्हाडाच्या अशा जागांवर ६२ ठिकाणी होर्डिंग असून ही होर्डिंग उभारण्यासाठी संबंधित कंपन्यांनी जागा मालक म्हणून म्हाडाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले. केवळ पालिकेच्या परवानगीने उभारले आहे. त्यामुळे ही होर्डिंग बेकायदेशीर किंवा अतिक्रमण ठरत असल्याने ती तत्काळ काढण्यासाठी संबंधितांना नोटीस दिल्या आहेत.
दरम्यान, संबंधित कंपन्यांनी होर्डिंग न काढल्यास म्हाडा अतिक्रमण असल्याचे निश्चित करून काढून टाकेल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करणार असल्याचीही माहिती म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी दिली.
यापुढे एनओसीशिवाय परवानगी नको
म्हाडाच्या जागेवर कोणाला होर्डिंग उभारायचे असेल किंवा तसा अर्ज आला तर पालिकेने म्हाडाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय (एनओसी) देऊ नये, असे पत्र म्हाडाने महापालिकेला दिले आहे. त्यामुळे बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांना चाप लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com