टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

Published on

मनोर, ता. ३ : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मस्तान नाका उड्डाणपुलाखाली टँकर चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघातात दुचाकीवरून गावोगाव फिरून गावरान कोंबड्या खरेदी करणारा जुनेद रौफ खाकर (रा. मालेगाव) टँकरखाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी मनोर गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (ता. ३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला होता. अपघात प्रकरणी टँकर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.