स्फोटप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

स्फोटप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

Published on

स्फोटप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
मालाड, ता. २ (बातमीदार) ः चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रा.लि. या सुरक्षा फ्यूज तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटास जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी मंत्री व मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. नागपूर शहरापासून २५ किमी अंतरावर असलेल्या या कंपनीत १३ जूनला स्‍फोट होऊन नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. लक्षवेधीवरील चर्चेत सहभागी होत अस्‍लम शेख यांनी अशा स्वरूपाच्या दुर्दैवी घटना घडूच नयेत, यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. मृतांच्या कुटुंबीयांना फक्त आर्थिक मदत करून सरकारला जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. फक्त कंपनीचा मालकच नव्हे, तर संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवरदेखील गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्‍यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.